आज दि. ०४/०७/२०१४ रोजी शिक्षण विभाग रावेर, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद, रावेर, रावेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळ, रावेर यांच्या सयुक्त विद्यमाने सरदार
जी जी हायस्कूल,
रावेर येथे एक दिवसीय माध्यमिक शिक्षकांची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत रावेर
चे गटशिक्षणाधिकारी श्री. एम. एन. धिमते, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. टी. डी. प्रधान
सरदार जी. जी. हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री. पी. आर. चौधरी, रावेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळ,
रावेर चे अध्यक्ष श्री. एस. डी. पाटील, सहसचिव श्री. एल. डी. अंतुर्लीकर
उपस्थित होते. सुरवातीला गटशिक्षणाधिकारी श्री. एम. एन. धिमते यांनी उपस्थित
४९ शाळांमधील विज्ञान शिक्षकांना मार्गदशन केले. नंतर श्री. एस. डी. पाटील सर यांनी १.
अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २. विज्ञान मंच ३. विज्ञान प्रदर्शन ४.
राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद ५. इन्सपायर अवॉर्ड या विज्ञान
परिक्षाविषयी जवळ जवळ ३ तास Power Point Presentation च्या सहाय्याने सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. आर. महाजन यांनी तर आभार श्री. एस. जे तडवी सर यांनी मानले. यावेळी रावेर तालुक्यातील ४९ शाळांचे विज्ञान शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विभाग रावेर चे अधिकारी तसेच सरदार जी जी हायस्कूल चे विज्ञान शिक्षक व राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद, रावेर, रावेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळ, रावेर चे सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली
No comments:
Post a Comment