विज्ञान मेळावा

अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा


      विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कार्यकारणभाव समजून विश्लेषनात्मक विचारांची जागृती करणे. स्पर्धात्मक वैज्ञानिक दृष्टीकोवृद्धिंगत करून भावी वैज्ञानिकांना विचारांच्या आदान प्रदानची संधी उपलब्ध करून देणे. देशात विखुरलेल्या प्रज्ञावंत युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणे ही उद्धिष्टे समोर ठेवून राष्ट्रीय संग्रहालय परिषद, कोलकत्ता, राष्ट्रीय विज्ञान केंद्र, नवी दिल्ली  व नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई  यांच्या सयुक्त विद्यमाने दरवर्षी अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा आयोजित केला जातो. या मेळाव्याचा विषय दरवर्षी वेगळा असतो.
स्पर्धेचे नियम व अटी :
१.      प्रथम तालुकस्तरावर जूले महिन्यात एका दिवसाची स्पर्धा आयोजित करून प्रत्येक तालुका स्तरावरील गुणानुक्रमे दोन विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात येते. जिल्हास्तरावर
ऑगस्ट महिन्यात एक दिवसीय स्पर्धेचे आयोजन प्रत्येक जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी(माध्य.) यांच्या 
मार्फत करण्यात येते.
२.     प्रत्येक जिल्ह्यातून दोन विद्यार्थ्यांची निवड विभागीयस्तर स्पर्धेसाठी करण्यात येते.
३.     विभागीय स्तरावर दोन विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तर स्पर्धेसाठी करण्यात येते.
४.    विभागीय स्तरावरील निवड झालेल्या विद्यार्थी/विद्यार्थिनीचा फोटो व भाषणाच्या तीन प्रती व त्याचे
इंग्रजी अनुवाद केलेल्या तीन प्रती सादर कराव्या लागतात.
५.    राज्यस्तरावर प्रत्येक विभागातून प्रथम व द्वितीय असे निवड झालेले दोन प्रमाणे ८ विभागातून १६
विद्यार्थी सहभागी होतात.यामधून राष्ट्रीयस्तरावरील विद्यार्थी विज्ञान मेळाव्यासाठी राज्यस्तरावरून
गुणानुक्रमे प्रथम येणार्‍या एका विद्यार्थ्याची निवड करण्यात येते.

तालुका, जिल्हास्तरीय व विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी नियम व अटी खलील प्रमाणे असतात
v कोणत्याही शासनमान्य शाळेतील इयत्ता ८ वी ते १० वी पर्येंत शिकणारे विदयार्थी (एका शाळेतून

फक्त एक विद्यार्थी )

No comments: