Wednesday, March 12, 2014

मार्च २०१४ महत्वाचे दिन

४ मार्च- कर्करोग दिन
७ मार्च गणित दिवस
८ मार्च – जागतिक महिला दिन
२१ मार्च – जागतिक वन दिन
२२ मार्च – जागतिक जल दिन
२३ मार्च – जागतिक हवामान दिन
२४ मार्च – जागतिक क्षयरोग दिन

Tuesday, March 11, 2014

जागतिक जल दिन 22 मार्च 2014


थीम : पाणी आणि ऊर्जा 

Energy and water demand will rise with the rise in population. By 2030, renewable energy demand will have risen by 60% (WWAP, 2009) and EIA (2010) estimates that global energy consumption will increase by around 50% from 2007 to 2035. With rising agricultural output, both water and energy consumption will increase which will lead to increased energy and water competition within the users and stakeholders. A rise of close to 19% of global agricultural water consumption is predicted by 2050. The situation could be worse without any technological advancement in the energy sector or with a status-quo with water and energy policy development). Up to 90% of freshwater usage is seen in some fast-developing nations. The global average comes up to ~70%.
Not just water use, but also the treatment of wastewater requires a significant amount of energy. The
interdependencies would only push the global energy needs up by 44% between 2006 and 2030 (IEA, 2009).

Sunday, February 16, 2014

राष्ट्रीय विज्ञान दिन २८ फेब्रुवारी


शास्त्रीय विषयात नोबेल पारितोषिक मिळवणारा पहिला भारतीय शास्त्रज्ञ म्हणजे सर चंद्रशेखर व्यंकट रमण होय. रशियन सरकारने "लेनिन" पुरस्काराने गौरविलेल्या चंद्रशेखरांना भारत सरकारनेही ''सर'' ही पदवी दिली होती. तामिळनाडू जिल्ह्यातील त्रिचनापल्ली येथील एका विद्वान ब्राह्मणाच्या घरात सन १८१८ मध्ये त्यंचा जन्म झाला. सुसंस्कृत घराण्यात, धार्मिक वातावरणात जन्मलेल्या चंद्रशेखरांचा धर्म अध्यात्म या विषयांकडे विशेष ओढा होता. विज्ञान गणित विषयांबरोबरच त्यांना संगिताचीही आवड होती. अंगभूत हुशारी आणि अभ्यासाची आवड यामुळे बाराव्या वर्षीच ते मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाले. लहानपणी रामायण, महाभारत वाचण्यात रमणारे चंद्रशेखर मोठेपणी विज्ञान विषयक पुस्तकात मग्न होऊ लागले.
पुस्तकांचा खजिना घरच्या वाचनालयातून त्यांना उपलब्ध होत होता. वाचनातून प्रगल्भ झालेल्या चंद्रशेखरांच्या वैज्ञानिक ज्ञानाचे आश्चर्य कौतुक त्यांच्या कॉलेजमधील प्राध्यापकांना वाटू लागले. आणि त्या विषयातील त्यांची प्रगती पाहून प्राचार्यांनी त्यांना कॉलेजच्या दोन वर्षाची सुट देऊन पुढील अभ्यासक्रमास परवानगी दिली.त्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षीच ते बी.. ची परीक्षा केवळ उत्तीर्णच झाले नाहीत तर ते विश्वविद्यालयात प्रथम आले. आणि त्याच परीक्षेतील विज्ञानविषयक सुवर्ण पदकही त्यांनीच पटकावले. याच कालावधीत त्यांनी संशोधन करून अनेक निबंध लिहिले. त्यांचे हे निबंध लंडन मासिकातून प्रसिद्ध होऊ लागले. या वाचन लेखनातून त्यांचे ज्ञानभांडार वाढू लागले. आणि वयाच्या अठराव्या वर्षी विज्ञान विषयातील पूर्वीचे सर्व उच्चांक मोडून ते प्रथम क्रमांकाने एम. . ची परीक्षा उत्तीर्ण झाले. खरतर लंडनला जाऊन आय. सी. एस. होण्याची त्यांची इच्छा होती पण वैद्यकीय तपासणीत अपयश आल्याने ते लंडनला जाऊ शकले नाहीतमग त्याच वर्षी त्यांनी अखिल भारतीय अर्थ विषयाची परीक्षा दिली. त्यात त्यांना उत्कृष्ट यश मिळाले. आणि अवघ्या एकोणीसाव्या वर्षी ते भारतीय अर्थ खात्यात 'असिस्टंट अकाऊंटट जनरल' बनले.
पण मुळातच विज्ञानाकडे ओढा असलेले रामन फार काळ नोकरीत रमले नाहीत. जेमतेम सहा वर्ष अर्थ खात्यात नोकरी करून त्यांनी त्या पदाचा राजिनामा दिला. आणि कलकत्ता येथील विश्वविद्यालयात विज्ञानाचे प्रध्यापक म्हणून रूजू झाले. अर्थ खात्यात नोकरी करित असतानाच त्यांचे संशोधनाचे काम चालूच होते. वयाची बत्तीस तेहतीस वर्षे पूरी झाली असताना लंडन येथील अनेक शास्त्रीय संस्थांनी त्यांना आपल्या संस्थेचे सदस्य करून घेतले. त्यांचे प्रकाशविषयक संशोधन जगन्मान्य झाले. सन १९३० मध्ये त्यांना वैज्ञानिक संशोधनाकरिता असलेले सर्वश्रेष्ठ "नोबेल परितोषिक" देण्यात आले. त्यानंतर सन१९३३ मध्ये बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेचे ते मुख्याधिकारी बनले. सन १९४३ मध्ये बंगलोर येथे त्यांनी स्वतःची अशी " रामन रिसर्च इंस्टीट्युट " ही संस्था स्थापन केली. नवनवीन शास्त्रीय उपकरणे बनविणे संशोधन करणेही कार्ये तेथे चालू आहेत. अगदी वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षापर्यंत ते स्वतःतेथे कार्य करीत होते. २१ नोव्हेंबर सन १९७० मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला.                        
रामन इफेक्ट
सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांना ज्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले तो शोध "रामन इफेक्ट" या नावाने प्रसिद्ध आहे. या संशोधनासाठी त्यांनी केवळ दोनशे रुपयाची साधने वापरली होती. सन १९२१ मध्ये रामन यांना कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून ब्रिटनला पाठविण्यात आले. तेथे रॉयल सोसायटीच्या सभेत निबंध वाचून झाल्यावर समुद्रमार्गे परतत असताना आकाशाच्या निळ्या रंगाबद्दल त्यांचे कुतुहल जागृत झाले. भारतात आल्यावर त्यांनी पाणी आणि बर्फ यावरून होणार्या प्रकाशाच्या प्रकीर्णनावर संशोधन चालू केले. त्याआधारे पाणी आकाश यांच्या निळ्या रंगाची कारणमीमांसा स्पष्ट केली.पारदर्शक पदार्थातून एक रंगी प्रकाशाचे प्रखर किरण गेले तर कय होईल याचा अभ्यास करीत असताना मिळणार्या वर्णपटात एक विशेष गोष्ट त्यांना आढळली. मूळ एक रंगी प्रकाशाशिवाय इतर अनेक कंपन संख्या असणार्या रेषा वर्णपटात उमटल्या होत्या. याचाच अर्थ पारदर्शक पदर्थातून जाताना प्रकाशाचे प्रकीर्णन झाले असा होतो. हाच तो रामन इफेक्टचा शोध होय. हा शोध २८ फेब्रुवारी १९२८ रोजी लागला. रासायनिक रेणूंची संरचना समजण्यासाठी या रामन परिमाणाचा उपयोग होतो. रामन यांच्या शोधानंतर केवळ दहा वर्षात दोन हजारापेक्षा जास्त संयुगांची रचना रामन परिमाणाच्या सहाय्याने निश्चित करण्यात आली.